रेनबॅक्‍सीच्या माजी प्रमोटरला अटक

नवी दिल्ली : रॅनबक्‍सी लॅबोरेटरीजचे माजी प्रमोटर आणि फोर्टीज हेल्थ केअरचा माजी सहसंस्थापक शिविंदर सिंग याच्यासह तीन जणांना दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणी रेलीगेर एन्टरप्राइजेसने निधी वळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.

शिविंदर यांनी आपल्या कौंटुंबिक व्यवसायातील गैरव्यवस्थापनाबद्दल आपले मोठे बंधू मल्विंदरसिंग आणि रेलीगेअरचा माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील गोधवानी यांच्यावर न्यायालयात खटला दाखल केला. यापुर्वी अंमलबजावणी संचनालयाने मल्विंदर आणि शिविंदरसिंग यांच्या निवास्थानावर ऑगस्ट महिन्यात छापे टाकले होते. या सिंगबंधूंनी केलेली आर्थिक अनियमितता आणि व्यवसायात झालेली पिछेहाट यामुळे ही कारवाई करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.