नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न दिल्ली सतर्कतेमुळे हाणून पाडला. या प्रकरणी इस्लामिक स्टेट्सच्या तीन जणांना अटक करण्यात आली.
इस्लामिक स्टेट्च्या तीन अतिरेक्यांकडून स्फोटासाठी वापरली जाणारे दूरनियंत्रके जप्त करण्यात आली. त्यामुळे मोठा कट उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. हे तीनही जण आसामची राजधानी गुवाहाटी येथील रहिवासी आहेत. मुक्कदस इस्लाम, रणजीत अली, लेवीस जमील जमाल अशी त्यांची नावेर आहेत.
पोलिस उपायुक्त प्रमोद खुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक सटेट्रस् च्या तीन अतिरेक्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून शक्तीशाली दूरनियंत्रके जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडे स्फोटकांचा साठाही सापडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.