नवी दिल्ली: शनिवारी दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात पार्किंग च्या झालेल्या हाणामारीचे प्रकरण आता चांगलेच चिघळले आहे. या प्रकरणानंतर सोमवारी वकिलांनी संप पुकारला होता. त्या नंतर आता पोलिसांनी देखील हातावर काळ्या फिती बांधत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच योग्य न्याय मिळावा यासाठी दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेर पोलीस कर्मचारी आंदोलन करत आहेत.
Delhi: Police personnel hold protest outside Police Head Quarters (PHQ), against the clash that broke out between police & lawyers at Tis Hazari Court on 2nd November. pic.twitter.com/FRthXQTk0T
— ANI (@ANI) November 5, 2019
आमच्यासोबत अन्याय होत असल्याने आम्ही शांततेत या विरोधात निषेध करत आहेत. पोलिसांना देखील योग्य वागणूक मिळून समान शिक्षा देण्यात यावी असं पोलिसांनी सांगितले. त्याचसोबत आम्ही या संर्दभात आयुक्तांसोबत देखील चर्चा करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
#WATCH Delhi Police personnel raise slogans of “Humara CP (Commissioner of Police) kaisa ho, Kiran Bedi jaisa ho” outside the Police Head Quarters (PHQ) in ITO. They are protesting against the clash that broke out between police & lawyers at Tis Hazari Court on 2nd November. pic.twitter.com/f4Cs7kx9Dr
— ANI (@ANI) November 5, 2019
उत्तर दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी दुपारी काही पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण ऐवढे वाढले की पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक वकील जखमी झाल्याने वकिलांनी पोलिसांच्या गाडीला पेटवून दिले होते. या ठिकाणी झालेल्या हाणामारीत आणि गोळीबारात काही जण जखमीही झाले होते. तीस हजारी कोर्टाच्या लॉक अपमध्ये वकिलाला जाण्यास पोलिसांनी रोखल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता.
#WATCH Delhi: Police personnel raise slogans of “we want justice” outside the Police Head Quarters (PHQ) in ITO. They are protesting against the clash that broke out between police & lawyers at Tis Hazari Court on 2nd November. pic.twitter.com/XFAbQn2gay
— ANI (@ANI) November 5, 2019