शरद पवारांवर हल्ला करणाऱ्याला अटक

नवी दिल्ली: २०११ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार आणि पोलिसांवर हल्ला करणार्‍या अरविंदर उर्फ ​​हरविंदर सिंगला दिल्ली पोलिसांनी अटक केली. आरोपी बराच काळ फरार होता. कोर्टाने देखील त्याला फरारी घोषित केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद सिंह यांनी २४ नोव्हेंबर २०११ रोजी नवी दिल्लीतील एनडीएमसी सेंटरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या कृषिमंत्री शरद पवार यांना चापट मारली होती. सामान्य माणूस अस्वस्थ असून नेते योग्य मुद्द्यांकडे लक्ष देत नसल्याचे आरोपींनी म्हटले होते.  त्यानंतर त्यांनी तलवारीने पोलिसांवर हल्ला केला.

यापूर्वी आरोपीने माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरुध्द दिल्लीतील कॅनॉट प्लेस आणि संसद पथ पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०१४ मध्ये, जेव्हा त्याने कोर्टाच्या सुनावणीला येणे टाळले त्यानांतर तो फरार झाला. तेव्हा पटियाला हाऊस कोर्टाने त्याला फरार घोषित केले. अरविंदरसिंग स्वरूप नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता आणि सतत घर बदलत होता. त्याला ११ नोव्हेंबर रोजी स्वरूप नगर येथून नवी दिल्ली जिल्ह्याच्या पोलिस पथकाने अटक केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here