दिल्ली – दिल्लीतून एक चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या पहाडगंज परिसरात चोरटयांनी एकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिरची पावडर टाकण्यात आलेला व्यक्ती करिअर कंपनीमध्ये कमला आहे. दिल्ली पोलिसांचे अनेक पथके चोरट्यांचा शोध घेत आहेत.
कुरिअर कर्मचाऱ्यावर अनेक दिवसांपासून चोरटे लक्ष ठेवून होते. आज सकाळी हल्लेखोर लक्ष लावून बसले होते आणि संधी मिळताच त्यांनी हा गुन्हा केला. यावेळी चोरटयांनी मोठी लूट केल्याचे देखील प्रकाशात आले. दोन व्यक्तींकडे दोन पिशव्या आणि एक बॉक्स होता ज्यामध्ये दागिने होते. हे दागिने चंदीगड आणि लुधियाना येथे नेण्यात येणार होते, मात्र त्याआधीच चार चोरट्यांनी घातपात करून ते दागिने हिसकावून नेले असल्याचे समोर आले आहे.
चोरट्यांमधील एक बदमाश पोलिसांच्या गणवेशात होता. त्यांनी तपासणीच्या बहाण्याने पीडितांना थांबवले असता मागून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून पिशव्या व बॉक्स घेऊन पळ काढला. सर्व दागिन्यांची अंदाजे किंमत सुमारे दोन कोटी असून उर्वरित वस्तूंची पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.