नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना आजही या पक्षाला महापौरपदापासून वंचित राहावे लागले आहे. आज महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी महापालिकेची सभा आयोजित करण्यात आली होती. पण त्याच्या कामकाजात वारंवार अडथळे आणले गेल्याने आजही ही निवड होऊ शकलेली नाही.
भाजप सदस्यांकडून गदारोळामुळे कामकाज स्थगित
बेकायदेशीर अडथळे निर्माण केले जात असल्याचा आपचा आरोप
आजही निर्वाचित नगरसेवकांऐवजी उपराज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेल्या नगरसेवकांना पहिल्यांदा शपथ दिली गेली होती. याच कारणावरून महापालिकेची या आधीची सभा तहकुब करण्यात आली होती. परंतु आज आम आदमी पक्षाने त्यांचा शपथ विधी आधी होण्यास हरकत घेतली नाही. त्यानंतर सर्व नवनिर्वाचित 250 सदस्यांनी शपथ घेतली. त्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होताना जे महापौरपदाच्या निवडणुकीत मतदानाला पात्र नाहीत अशा सदस्यांनी सभागृहाच्या बाहेर जावे अशी सूचना आम आदमी पक्षाच्या एका नगरसेवकाने केल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी गदरोळ करून कामकाज हाणून पाडले आणि ते अनिश्चीत काळासाठी तहकुब करण्यात आले.
दिल्ली महापालिकेची निवडणूक 14 डिसेंबरला झाली आहे पण अजूनही स्पष्ट बहुमत असूनही आम आदमी पक्षाचा महापौर करण्यास भाजपकडून आडकाठी केली गेली आहे त्याबद्दल आम आदमी पक्षाने जोरदार निषेध नोंदवला आहे.
#KonkanRailway : कोकण रेल्वे परिसरातील 37 स्थानकांचे होणार सुशोभीकरण – उपमुख्यमंत्री फडणवीस
भाजप बेकायदेशीरपणे या महापालिकेत राज्यपाल नियुक्त नगरसेवक घुसवून त्यांना मतदानाचा अधिकार देऊ पहात आहे असाही त्या पक्षाचा आरोप आहे. आज या सभेत गदारोळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन सभागृहातच सुरक्षा रक्षक तैनात केले गेले होते.