नवी दिल्ली – दिल्लीतील केजरीवाल सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी कपात केली असून ही दिलासादायक बातमी दिल्लीकरांना दिली आहे. आज रात्रीपासूनच दिल्लीत पेट्रोलचे नवे दर लागू होणार आहेत.
Delhi Govt reduces VAT on petrol to 19.40% from 30%, petrol price to reduce by Rs 8 per litre, new rates to come in to effect from midnight today pic.twitter.com/BV0chqRj5V
— ANI (@ANI) December 1, 2021
1 डिसेंबर 2021 रोजी दिल्ली सरकारने राजधानीत पेट्रोलवरील व्हॅट कमी केला आहे. केजरीवाल सरकारच्या या निर्णयानंतर दिल्लीत पेट्रोल सुमारे 8 रुपयांनी स्वस्त होणार असून, त्यानंतर दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 95.97 रुपये प्रति लिटर होईल. आज मध्यरात्रीपासून पेट्रोलचे नवे दर लागू होणार आहेत.
कॅबिनेट बैठकीत घेतला निर्णय
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. या बैठकीत केजरीवाल यांनी पेट्रोलवरील व्हॅट 30 टक्क्यांनी कमी करून 19.40 टक्के केला आहे. त्यामुळे आज रात्रीपासून पेट्रोल भरणाऱ्यांना 8 रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळणार आहे.