Sheesh Mahal Delhi | भाजपाने विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानाचा मुद्दा उपस्थित केला, ज्याला ‘शीशमहल’ म्हटले. केजरीवाल सरकारने या इमारतीचे अवाजवी नुतनीकरून करून तिचे आलिशान बंगल्यात रुपांतर केले होते. यावर करण्यात आलेल्या खर्चावरून व केजरीवाल यांनी या बंगल्याचा वापर करण्यावरून भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीच्या काळात केजरीवाल यांच्यावर व आम आदमी पार्टीवर सडकून टीका केली होती.
भाजपाने जाहीर केले होते की, जर आम्ही सत्तेवर आली तर मुख्यमंत्री त्या घरात राहणार नाहीत तर ते लोकांसाठी खुले केले जाईल. परंतु आता सरकार शीशमहलचा गेस्ट हाउस (राज्य सरकारचे शासकीय अतिथीगृह) म्हणून वापर करण्याचा विचार करत आहे.
सरकारी बंगल्यावर करोडो रुपयांचा खर्च
आम आदमी पक्षावरील हल्ला तीव्र करण्यासाठी ‘शीशमहल’ 6 , फ्लॅग स्टाफ रोडशी संबंधित एक व्हिडिओही भाजपने जारी केला होता. ज्याद्वारे दावा करण्यात आला होता की अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री असताना नूतनीकरणात कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपाने असे म्हटले होते की केजरीवाल स्वत: ला एक सामान्य माणूस म्हणतात पण त्यांनी सरकारी बंगल्यावर कोटी रुपये खर्च केले. तसेच या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी केलेल्या खर्चावरून भाजपाने केजरीवाल व आम आदमी पार्टीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. Sheesh Mahal Delhi |
याबाबत एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की “दिल्लीला भेट देणाऱ्या मान्यवरांसाठी राज्य अतिथीगृहाची आवश्यकता आहे. इतर राज्यांमध्ये अशी अतिथीगृह आहेत. पण दिल्लीत अतिथीगृह नाही. त्यामुळे ६, फ्लॅग स्टाफ रोडवरील ही इमारत अतिथीगृहात रुपांतरित करण्याचा विचार केला जात आहे. मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.” Sheesh Mahal Delhi |
पुढे या अधिकाऱ्याने अधिक माहिती देताना सांगितले की, १९९० च्या दशकात ६, फ्लॅग स्टाफ रोडच्या शेजारी असलेली मालमत्ता, ३३, शामनाथ मार्ग ही राज्य अतिथीगृह म्हणून निवडली होती. तिथे अतिथीगृह उभारण्याची योजना आखली होती. मात्र तीन ते चार वर्षांनी तत्कालीन सरकारने तो विचार सोडून दिला. तेव्हापासून दिल्लीत कुठेही अतिथीगृह नाही.
त्यानंतर १९४२ मध्ये बांधण्यात आलेल्या ६, फ्लॅग स्टाफ रोड या बंगल्यात तेव्हा पाच बेडरूम, एक हॉल आणि एक कार्यालय होते. १९६० पासून ही मालमत्ता व आसपासचा परिसर दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा आहे. केजरीवाल २०१५ पासून ऑक्टोबर २०२४ पर्यंत आपल्या कुटुंबासोबत येथे वास्तव्यास होते. २०२० च्या पावसाळ्यात या बंगल्यातील एका खोलीचे छप्पर कोसळले. तसेच करोना काळात एका शौचालयाचे छत कोसळले. त्यानंतर आप सरकारने या बंगल्याचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा: