नवी दिल्ली – दिल्ली मध्ये एका ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केली गेली. तसेच अत्याचार आणि हत्येनंतर पीडितेवर अंत्यसंस्कार सुद्धा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांनी न्याय मिळेपर्यंत राहुल गांधी तुमच्यासोबत असेन असे ग्वाही दिली आहे.
Delhi: Congress leader Rahul Gandhi meets the family of the minor girl who was allegedly raped, murdered, and cremated without her parents' consent in Old Nangal crematorium recently. pic.twitter.com/0IqN0M7SQz
— ANI (@ANI) August 4, 2021
राहुल गांधी म्हणाले की, मी पीडितेच्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली असून त्यांना न्याय हवा आहे. त्यांच्यावर अन्याय झाला असून त्यांची मदत करायला हवी आणि आम्ही ते करणार आहे. मी त्यांना सांगितले आहे की मी त्यांच्या सोबत आहे. राहूल गांधी तुमच्या सोबत उभा आहे. जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही.