#IPL2021 : नोर्जेने टाकला सर्वांत वेगवान चेंडू

दुबई -दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना एका वेगवान गोलंदाजाच्या तुफानी गोलंदाजीने लक्षात राहील. या सामन्यात हैदराबादचा सलामीवीर व ऑस्ट्रेलियाचा आश्‍वासक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला बाद करताना दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्जे याने यंदाच्या मोसमातील सर्वांत वेगवान चेंडू टाकला. 

या चेंडूवर नोर्जेने वॉर्नरला अक्षर पटेलकरवी झेलबाद केले. 2016 सालानंतर प्रथमच वॉर्नर आयपीएल स्पर्धेत खाते न उघडता बाद झाला.

मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असलेल्या नोर्जेने यापूर्वीही सातत्याने 140 किमी वेगाने गोलंदाजी केली आहे. पण वॉर्नरला बाद केले तो चेंडू त्याने तब्बल 151.7 किमी वेगाने टाकला. या षटकात त्याने 149.2 किमी प्रतितास, 149.9 किमी प्रतितास, 151.7 किमी प्रतितास, 146.4 किमी प्रतितास, 147.4 किमी प्रतितास आणि 148.3 किमी प्रतितास असे वेगवान चेंडू टाकले.

नोर्जेने तिसरा चेंडू 151.71 किमी प्रतितास वेगाने टाकला, जो आतापर्यंतच्या मोसमातील सर्वांत वेगवान चेंडू ठरला आहे. आयपीएलच्या यंदाच्या स्पर्धेत विविध गोलंदाजांनी टाकलेल्या सर्वांत वेगवान 10 चेंडूंपैकी 7 चेंडू नोर्जे यानेच टाकले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.