Delhi Election Results 2025 । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी करण्यास सुरु आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनूसार भाजपने यंदा दिल्लीत मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. सकाळी 9.30 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनूसार, मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलानुसार, भाजप 44, आम आदमी पक्ष 24 आणि काँग्रेस पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीत बहुमतासाठी 36 मॅजिक फिगर गाठणं आवश्यक आहे. त्यामुळे भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल दिसून येत आहे.
दिल्लीत कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? Delhi Election Results 2025 ।
* रिठाला येथून भाजपचे कुलवंत राणा आघाडीवर
* बल्लीमारनमधून आपचे इम्रान हुसेन पुढे
* ओखला येथून भाजपचे मनीष चौधरी यांनी आघाडी घेतली
* मोती नगरमधून भाजपचे सतीश खुराणा आघाडीवर
* ग्रेटर कैलाशमधून आप नेते सौरभ भारद्वाज यांनी आघाडी घेतली
* शकूर बस्ती येथून आपचे उमेदवार सत्येंद्र जैन आघाडीवर
* राजौरी गार्डनमधून भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा आघाडीवर आहेत
* करावल नगर मतदारसंघातून भाजपचे कपिल शर्मा आघाडीवर
* बिजवासन मतदारसंघातून भाजपचे कैलाश गेहलोत पुढे आहेत
* लक्ष्मी नगर मतदारसंघातून भाजप पुढे
* बदरपूर मतदारसंघातून भाजपचे नारायण दत्त शर्मा पुढे
* रोहिणी मतदारसंघातून भाजपचे बिजेंद्र गुप्ता पुढे
* चांदणी चौकातून भाजपचे सतीश जैन यांच्या पुढे
* दिल्ली कॅन्टकडून भुवन तंवर पुढे
* ग्रेटर कैलासमधून आपचे सौरभ भारद्वाज आघाडीवर
* मालवीय नगरमधून भाजपचे सतीश उपाध्याय पुढे
* बुराडीहून संजीव झा पुढे आहेत
* ग्रेटर कैलाश मतदारसंघातून सौरभ भारद्वाज पिछाडीवर आहेत
आंध्र प्रदेश, झारखंडची पुनरावृत्ती होणार? Delhi Election Results 2025 ।
आम आदमी पक्षाला सत्तेतून बाजूला सारण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपने दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण चांगलेच तापवले. त्यातच केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमांतून 2024 मध्ये अरविंद केजरीवाल यांना याच दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला. केजरीवाल यांच्यासोबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनाही तुरुंगात जावे लागले. 2024 मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवास झाला. त्यानंतर हेमंत सोरेन आणि पवन कल्याण यांना त्यांच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाल्याने विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना विजय मिळवता आला. मात्र, अरविंद केजरीवाल यांना दिल्लीमध्ये अशी सहानुभूती मिळाल्याचे दिसून येत नाही. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून उभे राहिलेल्या केजरीवाल यांचे नेतृत्व आता त्याच मुद्द्यांवर अडचणीत आले आहेत.