नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज (दि. ८) दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. रिंगणात उतरलेल्या ६७२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
दरम्यान, सकाळी ८ वाजता दिल्लीमध्ये मतदानाला सुरुवात झाली असून, बॉलिवूड मधील अष्टपैलू अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ हिने सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी तापसी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदान केंद्रावर हजर होती.
View this post on Instagram