नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी चौकशीदरम्यान दबाव टाकण्यात आल्याचा केलेला दावा सीबीआयने तातडीने फेटाळून लावला.
सिसोदिया यांची कायदेशीर पद्धतीनेच चौकशी झाली. गुन्हा नोंदवताना जे आरोप ठेवण्यात आले; त्यांच्या अनुषंगाने आणि पुराव्यांच्या आधारे चौकशी करण्यात आली. सिसोदिया यांनी केलेल्या दाव्यातील सत्यतेची पडताळणी केली जाईल. त्यानुसार, आवश्यक ती पाऊले उचलली जातील, असे सीबीआयने जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले.
‘त्या’ आठ राज्यांनी विमान इंधनावरील दर कमी करावेत – केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भाजप नेते मनोज तिवारी यांना मानहानीच्या फौजदारी खटल्यात येथील ट्रायल कोर्टाने बजावलेले समन्स रद्द करण्यास नकार दिला आहे. मनोज तिवारी यांनी ट्रायल कोर्टाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
तेथे त्यांची याचिका अमान्य करण्यात आल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु त्यांना तेथेही दिलासा मिळू शकला नाही. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचा खोटा आरोप केल्यामुळे सिसोदिया यांनी त्यांच्यावर बदनामीचा खासगी फौजदारी खटला दाखल केला आहे.