दिल्ली : ‘आप’ आमदार सोमनाथ भारती यांना न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांना दिल्ली न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोमनाथ भारती यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी दाखल केलेला गुन्हा दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

दरम्यान, सोमनाथ भारती यांच्या पत्नी लिपिका मित्रा यांनी 10 जून 2015 रोजी दिल्ली महिला आयोगाकडे सोमनाथ भारती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 2010 मध्ये लग्न झाल्यापासूनच पतीकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार पत्नी लिपिका मित्रा यांनी तक्रार दिल्यानंतर सोमनाथ भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.