नवी दिल्ली : देशभर खळबळ उडवून देणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मुकेश कुमार याचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर दिल्ली न्यायलयाने त्याच्या फाशीसाठी नवे डेथ वॉरंट जारी केले. आरोपींना आता एक फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे.
दरम्यान हा दयेचा अर्ज फेटाळावा म्हणून मुकेशने अधिकृत अर्ज दिला होता, असे न्यायालयात सांगण्यात आले.
तत्पुर्वी गृह मंत्रालयाने हा दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस राष्ट्रपतीकडे केली होती.
तिहार कारागृह प्रशासनाने राष्ट्रपतींकडील दयेच्या अर्जावरील निकाल आल्यानंतर फाशीची नवीन तारीख कळवावी, अशी मागणी गुरूवारी दिल्ली प्रशासनाकडे केली होती.