नवी दिल्ली :– दिल्लीच्या एकत्रित महापालिकेच्या 250 वॉर्डसाठी रविवारी मतदान झाले. गेल्या तीन टर्मपासून येथे भारतीय जनता पार्टीची सत्ता असून चौथ्यांदा महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने येथे प्रचंड ताकद लावली होती. त्यांना आम आदमी पक्षाने जोरदार लढत दिली असून कॉंग्रेसही स्पर्धेत आहे.
असे असताना रविवारी मतदार यादीतून आपले नावच गायब असल्याची तक्रार अनेक मतदारांनी केली आहे. विशेष म्हणजे दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांचे नावही यादीत नव्हते. त्यामुळे त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चौधरी म्हणाले की, मी लोकसभा निवडणुकीत मतदान केले. 2020 मध्ये दिल्ली विधानसभेसाठी मतदान केले. आज मात्र मतदानाला आलो तेव्हा यादीत माझेच नाव नव्हते. माझ्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी मतदान केले. मी निवडणूक आयोगाकडे चौकशी केल्यावर माझे नाव अन्यत्र शिफ्ट झाल्याचे मला सांगण्यात आले. मात्र अन्यत्र म्हणजे कुठे ते त्यांनी सांगितले नाही.
Rajasthan : …त्यामुळे भाजप पक्ष प्रचंड अस्वस्थ झालाय – सचिन पायलट
जिंकण्यासाठी भाजपकडूनच हे असले प्रकार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी असे काहीही केले तरी दिल्लीत महापौर आमचाच होईल आणि पुन्हा शीला दीक्षित यांच्या काळात होती ती दिल्ली सगळ्यांना पाहायला मिळेल असा दावा त्यांनी केला.