राजधानी दिल्लीत 3 जणांचे भूकबळी

नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 3 जणांचा भूकबळी गेल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात पूर्व दिल्लीतील मंडावली भागातील तीन लहान मुलींचा उपासमारीने बळी गेला आहे. या तिन्ही मुलीच्या पोटात अन्नाचा कणही नसल्याचे आणि बऱ्याच काळापासून त्यांना पौष्टिक आहार मिळालेला नसल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले आहे. या तीन मुली त्यांच्या घरात मंगळवारच्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या होत्या. शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मानसी (8), शिखा (4) आणि पारूल (2) अशी या मुलींची नावे आहेत. या तिन्ही मुलांचे वडील मंगळवारपासूनच बेपत्ता आहेत. त्यांची आई मानसिकदृष्ट्‌या कमकुवत असल्याने काहीही माहिती मिळू शकली नाही. या तिन्ही मुलींचा मृत्यू एकाच दिवशी झाला की वेगवेगळ्या दिवशी, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या तिघींचे बुधवारी पुन्हा एकदा शवविच्छेदन केले गेले. मंगळवारच्याच शवविच्छेदन अहवालाद्वारे हे मृत्यू भुकेमुळे झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. हे मृत्यू विष किंवा जखम किंवा हत्येमुळे झाल्याचे अंदाज फेटाळून लावण्यात आला आहेत. आज झालेल्या शवविच्छेदनाचे अहवाल दोन-तीन दिवसांमध्ये येतील, असे सांगितले जात आहे. आज संध्याकाळी तिन्ही मुलींचे शव त्यांच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहेत. शेजाऱ्यांनी मुलींचे अंत्यसंस्कार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)