#IPL2019 : दिल्ली कॅपिटल्ससमोर हैदराबादचे तगडे आव्हान

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद

वेळ – रा. 8.00
स्थळ – फिरोझ शाह कोटला मैदान, नवी दिल्ली

नवी दिल्ली – पहिल्या सामन्यापासूनच फॉर्ममध्ये असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघासमोर सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे.

आयपीलच्या गत मोसमातील उपविजेती ठरलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाने पहिल्या सामन्यापासून फलंदाजीत सातत्य राखत आता पर्यंत आपल्या तीन सामन्यात दोन विजय आणि एक पराभव स्विकारत क्रमवारीत तिसरे स्थान गाठले असून यंदाच्या मोसमात त्यांच्या सलामीवीरांनी तिनही सामन्यात संघाला चांगली सुरूवात करुन दिली असून मधल्या फळीतील विजय शंकरने देखील फटकेबाजी करत हैदराबादच्या फलंदाजीला बळकत करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन देन्यात मदत केली आहे.

यावेळी हैदराबच्या संघातील गोलंदाजांना कोलकाता विरुद्धचा सामना वगळता इतर सामन्यात चांगली गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. यावेळी हैदराबचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टोहे ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादित पहिल्या दोन खेळाडूंमध्ये आहेत. यंदाच्या मोसमात शतक झळकावणाऱ्या तीन खेळाडूंमध्ये हैदराबादचे दोन्ही सलामीवीर आहेत. डेव्हिड वॉर्नरने तीन सामन्यांअम्ध्ये 254 धावा जमवल्या आहेत. तर. जॉनी बेयर्स्टोने तीन सामन्यांमध्ये 198 धावा जमवल्या आहेत. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मोहम्मद नबी नवव्या स्थानी असून त्याने एका सामन्यात 4 गडी बाद केले आहेत.

तर, दुसरीकडे दिल्लीच्या संघाने आतापर्यंत संमिश्र कामगिरी केली असून आपल्या चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी त्यांच्या सलामीवीरांपैकी धवनने चांगली कामगिरी केली असून पृथ्वी शॉने केवळ एकाच सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. तर,

मधल्याफळीतील फलंदाजांपैकी ऋषभ पंतने मुंबईच्या सामन्यात केलेल्या फटकेबाजीनंतर पुढील तीनही सामन्यात त्याला प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यातच कर्णधार श्रेयस अय्यरने सर्व सामन्यात चांगली सुरूवात केल्यानंतर आपल्या खेळीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात तो अपयशी ठरला आहे.

मधल्याफळीतील हनुमा विहारी, अक्षर पटेलयंना चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याने पंजाब विरुद्धच्या सामन्यात विजयाजवळ येवून त्यांना पाराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच त्यांच्या संघातील कगिसो रबाडा, संदिप लामिच्छाने यांनी चमकदार कामगिरी करत दिल्लीच्या गोलंदाजीची धार वाढवली आहे. आजच्या सामन्यात दिल्लीच्या संघाला जिंकायचे असेल तर फलंदाज आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी करण्याची गरज असून मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारीने खेळी करण्याची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पॉल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.