#IPL2019 : दिल्लीसमोर आज बंगळुरूचे आव्हान

-पंतला रोखण्यास विराटला विशेष रणनीतीची गरज
-बंगळुरूच्या बाद फेरीच्या आशा अद्याप जिवंत
-दिल्ली प्ले ऑफपासून एक पाऊल दूर

नवी दिल्ली – आयपीएलच्या बाराव्या मोसमातील सर्वात समतोल असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला यंदाच्या मोसमात बाद फेरीत पोहोचण्यास एक विजयाची आवश्‍यकता असून आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ गाठण्यास दिल्लीचा संघ उत्सुक असणार असून बंगळुरूच्या संघाचा एक पराभव त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपवण्यास कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे बंगळुरूचा संघ आपला विजयरथ कायम राखण्यास उत्सुक असणार आहेत.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात सर्वात खराब सुरुवात अनुभवलेल्या बंगळुरूच्या संघाने लागोपाठ सहा पराभवांनंतर विजय मिळवत स्पर्धेत पुनरागमन केले असून आता केवळ एक पराभव त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात बंगळुरूला विजय मिळवणे अत्यावश्‍यक असून यंदा त्यांनी 11 पैकी सात सामन्यांत पराभव तर चार सामन्यात विजय मिळवला असून सध्या क्रमवारीत अखेरच्या स्थानी आहेत. त्यातच त्यांचे केवळ तीन सामने बाकी असून आगामी तीनही सामने जिंकल्यास त्यांचे चौदा गुण होतील त्यामुळे त्यांना बाद फेरी गाठण्यास रनरेटचा आधार घ्यावा लागणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

वेळ – दु. 4.00 वा.
स्थळ – फिरोज शाह कोटला मैदान, दिल्ली

आजच्या सामन्यात त्यांना दिल्लीला एकतर्फी पराभूत करणे गरजेचे आहे. तर, दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने यंदाच्या मोसमात आतापर्यंतच्या त्यांच्या कामगिरीच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. त्यातच ते प्ले ऑफमध्ये जागा निश्‍चित करण्याच्या केवळ एक पाऊल दूर आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून बाद फेरी गाठण्याचे त्यांचे उद्दिष्ट असणार आहे. यावेळी दिल्लीने यंदा आपल्या अकरा सामन्यांमध्ये 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे त्यांचे चौदा गुण झाले असून ते क्रमवारीत सध्या तिसऱ्या स्थानी आहेत.

त्यातच दिल्लीचा संघ क्रमवारीत पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानी जागा मिळवण्यास उत्सुक असून त्यांच्या साखळी फेरीतील अखेरच्या तीन सामन्यात ते विजय मिळवण्यास प्रयत्नशील असणार आहेत. कारण पहिल्या दोन संघातील पराभूत संघ उपान्त्यफेरीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील विजयी संघासोबत सामना खेळून अंतिम सामन्यात स्थान मिळवू शकतो. त्यामुळे अंतिम फेरी खेळण्यासाठी असणारी अतिरिक्त संधी मिळवण्यास दिल्लीचा संघ उत्सुक असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी, शिवम दुबे, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप सिंह, देवदत्त पडीकल, हेन्‍रीच क्‍लासिन, गुरकीरत सिंह, हिम्मत सिंह, प्रयास राय बर्मन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.