#IPL2019 : पराभवाचा वचपा काढण्याची मुंबईला संधी

 ऋषभ पंतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष;  विजयीलय राखण्याचे दिल्लीपुढे आव्हान

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
स्थळ – फिरोज शाह कोटला मैदान, नवी दिल्ली
वेळ – रा. 8.00 वा

नवी दिल्ली – आयपीएलच्या बाराव्या मोसमात अतापर्यंत प्रभावी कामगिरी करत क्रमवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स दरम्यान आज सामना होणार असून आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून झालेल्या मोठ्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मुंबई इंडियन्सकडे असणार आहे. तर, आजचा सामना जिंकून आपली विजयीलय कायम राखण्याचे आव्हान दिल्ली कॅपिटल्स समोर असणार आहे.

मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील आपल्या आठ सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. तर, तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ते क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून त्यांचे दहा गुण झालेले आहेत. यावेळी मुंबईने दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्था रॉयल्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांचा पराभव करत दहा गुण मिळवले आहेत.

तर दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आठ सामन्यत पाच विजय आणि तीन पराभव पत्करत 10 गुणांसह दुसरे स्थान मिळवलेले आहे. यावेळी त्यांनी मुंब्‌ अई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबादयांचा पराभव केला. तर, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

यावेळी दिल्ली आणि मुंबई या संघांदरम्यान झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची लक्तरे वेशीवर टांगत अखेरच्या सात षटकांमध्ये 101 धावा वसूल करत निर्धारीत 20 षतकांत 213 धावांची मजल मारली होती. यावेळी दिल्लीच्या ऋषभ पंतने केवळ 27 चेंडूत नाबाद 78 धावांची खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई केली होती. यावेळी मुंबईच्या सर्वच गोलंदाजांनी तब्बल 10च्या सरासरीने धावा दिल्या होत्या. यावेळी मुंबईकडून युवराज सिंग वगळता इतर एकाही फलंदाजाला अपेक्षीत कामगिरी करता आली नव्हती त्यामुळे मुंबईने हा सामना सहज गमावला होता.

मात्र, या सामन्यानंतर मुंबईच्या संघाने आपल्या कामगिरीत बरीच सुधारणा करत अनेक सामने पिछाडीवरुन पुढे येत जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यातही त्यांच्या फलंदाज आणि गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असून आजच्या सामन्यात विजय मिळवून पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी मुंबईच्या संघाकडे असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्‍लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, रसिक सलाम, अल्झारी जोसेफ.

दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.