मुंबई – आयपीएलमध्ये आज 34 वा सामना खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सचा संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने आहेत. राजस्थानची कमान संजू सॅमसनच्या हातात आहे, तर ऋषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने टाॅस जिंकून राजस्थानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग-11मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Delhi Capitals have won the toss and they will bowl first against #RR.
Live – https://t.co/IOIoa87Os8 #DCvRR #TATAIPL pic.twitter.com/81U0oOwrFO
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली असून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आजच्या सामन्यात प्रशिक्षक पाँटिंगही संघासोबत नाहीत.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग-11 :
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, ऋषभ पंत (c&wk), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजुर रहमान
राजस्थान रॉयल्स प्लेइंग-11 :
जोस बटलर, करुण नायर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (c&wk), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, रविचंद्रन अश्विन, ओबेद मॅककॉय, प्राणंधन कृष्णा, युझवेंद्र चहल
दरम्यान, राजस्थानचा संघ या मोसमात आत्तापर्यंत खूप मजबूत स्थितीत आहे. सहा पैकी चार सामने जिंकून 8 गुण आणि चांगल्या धावगतीसह गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. तर दिल्लीची कामगिरी संमिश्र आहे. दिल्लीच्या संघाने सहा पैकी तीन विजय मिळवले असून सहा गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.