मुंबई : आयपीएल 2022 च्या 55 व्या सामन्यात आज चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध सामना होत आहे. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाणेफेक(टाॅस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Delhi Capitals have won the toss and they will bowl first against #CSK.#TATAIPL #CSKvDC pic.twitter.com/TmEn7iCDJQ
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
कर्णधार पंतने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. पंतने मनदीप सिंग आणि ललित यादवच्या जागी केएस भरत आणि अक्षर पटेलला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले आहे. त्याचवेळी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही प्लेइंग-11 मध्ये 1 बदल केला आहे. रवींद्र जडेजाच्या जागी शिवम दुबेचा प्लेईंग-11 मध्ये समावेश केला आहे. जडेजा फिट नसल्याचे धोनीने सांगितले आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे :
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, एमएस धोनी (w/c), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, महेश तिक्षन, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी.
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (w/c), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, अॅनरिक नॉर्टजे.