DC vs LSG Delhi Capitals beat Lucknow Super Giants by 1 wickets : दिल्ली कॅपिटल्सने आशुतोष शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर इतिहास रचला आहे. दिल्लीने आशुतोष शर्मा आणि विप्राज निगम यांच्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर रोमांचक सामन्यात लखनौवर १ विकेट्स आणि ३ चेंडू राखून शानदार विजय नोंदवला. त्याचबरोबर दिल्लीने लखनौविरुद्ध धावांचा पाठलाग करताना आयपीएल इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला आहे.
आशुतोष शर्माच्या अर्धशतकामुळे दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा एका विकेट्सने पराभव करून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. सोमवारी विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, लखनौने निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांच्या स्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत आठ गडी गमावून २०९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दिल्लीने १९.३ षटकांत नऊ गडी गमावून २११ धावा केल्या आणि सामना जिंकला.
आशुतोष शर्मा आणि विप्राज निगम यांची शानदार खेळी –
LONG LIVE, IPL…..!!! 👏
– One of the greatest run chases in history, take a bow Ashutosh Sharma. 🫡pic.twitter.com/rxVzthPDC0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 24, 2025
दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच २१० धावांच्या लक्ष्याचा दबाव दिसून येत होता. पहिल्याच षटकात संघाने दोन विकेट्स गमावल्या. या षटकात शार्दुलने जॅक फ्रेझर मॅकगर्क (१ धाव) आणि अभिषेक पोरेल यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अभिषेक खाते न उघडताच बाद झाला. संघाला तिसरा धक्का ७ धावांवर असताना लागला जेव्हा समीर रिझवी ४ धावा करून बाद झाला. यानंतर, कर्णधार अक्षर पटेल आणि उपकर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये ४३ धावांची भागीदारीही झाली. पण दोघांच्याही जाण्यानंतर दिल्लीच्या चाहत्यांनी आशा सोडली होती.
हेही वाचा – DC vs LSG : निकोलस पूरनचा कहर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध षटकारांचा पाऊस पाडत केला मोठा पराक्रम
येथून, आशुतोष शर्मा आणि नवोदित विप्राज निगम यांनी दिल्लीला सामन्यात परत आणले. दोघांमध्ये ५५ धावांची भागीदारी झाली, पण नंतर १६ षटकांनंतर टाइमआउट झाला. या ब्रेकमध्ये डीसीच्या दोन्ही फलंदाजांचा वेग भंग झाला. टाइम आउटनंतर, पुढच्या षटकाच्या पुढच्या चेंडूवर विप्राज निगम बाद झाला. त्याने १५ चेंडूत ३९ धावा केल्या. निगम बाद झाल्यानंतरही आशुतोषने आशा सोडली नाही. त्याने खालच्या फळीतील फलंदाजांसोबत उत्तम फलंदाजी केली आणि दिल्लीला विजय मिळवून दिला. आशुतोष शर्माने ३१ चेंडूत ६६ धावा करून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. विशेष म्हणजे आशुतोषने शेवटी षटकार मारून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याने आपल्या खेळीत
हेही वाचा – Rahul Athiya Baby Girl : केएल राहुल IPL 2025 दरम्यान बनला ‘बापमाणूस’! पत्नी अथिया शेट्टीने दिला बाळाला जन्म
तत्पूर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने दिल्लीसमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले होते. लखनौसाठी निकोलस पूरनने ३० चेंडूत ७५ धावांची खेळी केली, त्याच्या बॅटने ६ चौकार आणि ७ षटकार मारले. मिचेल मार्शने ३६ चेंडूत ७२ धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. यानंतर, लखनौचा डाव डळमळीत झाला. डेव्हिड मिलर १९ चेंडूत २७ धावा करून नाबाद राहिला. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने ३ आणि कुलदीप यादवने २ विकेट घेतल्या.