भाजपचे प्रवक्ते पत्नीसह अपघातात ठार

कन्नौज – भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे प्रवक्ते संदीप शुक्‍ला आणि त्यांच्या पत्नी अनिता या दोघांचे उत्तरप्रदेशातील एका रस्ते अपघातात निधन झाले. हा अपघात थातिया गावाजवळ एक्‍स्प्रेस वे वर झाला.

संदीप वय 45 आणि त्यांच्या पत्नी अनिता वय 42 हे आपली तीन मुले आणि दोन अन्य परिचितांसमवेत प्रतापगड येथे एका लग्न समारंभासाठी वाहनातून जात असताना त्यांच्या गाडीची ट्रकला धडक बसून हा अपघात झाला.

त्यात संदीप शुक्‍ला व त्यांच्या पत्नी जागीच ठार झाले तर त्यांची तिन्ही मुले आणि अन्य दोन सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तिरवा गावातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.