दिल्लीत दहा वर्षांपेक्षा जास्त जुन्या डिझेल वाहनांवरील बंदी कायम

नवी दिल्ली- राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली व एनसीआर परिसरात दहा वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांच्या वापरावर निर्बंध घातले असून या वाहनांची नोंदणीच रद्द करण्याचा आदेश लवादाने जारी केला आहे.
त्या आदेशाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारी याचिका या लवादाकडे करण्यात आली होती. पण हरित लवादाने ही याचिका फेटाळून लावली असून या वाहनांवरील बंदी आदेश कायम ठेवला आहे.
या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानेही या आधीच फेटाळून लावली आहे. विविध शाळांच्या वतीने ही याचिका करण्यात आली होती. त्यात त्यांनी दहा वर्षांच्या अवधीतून कोविडचा कालावधी वजा करावा आणि तेवढी मुदतवाढ मिळावी अशी मागणी या शाळांच्यावतीने करण्यात आली होती.
तथापि जुन्या डिझेल वाहनातून होणारे प्रदुषण भयंकर असल्याने या आदेशात कोणतीही सवलत देता येणार नाही असे लवादाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.