Delhi Axis My India Exit Poll: दिल्लीत बुधवारी (दि. 5) विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. पण मतदानाच्या एका दिवसानंतर आम आदमी पार्टीसाठी (आप) झोप उडवणारा एक्झिट पोल समोर आला आहे.
ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपला दिल्लीत 45-55 जागा मिळू शकतात. तर आम आदमी पक्षाला 15 ते 25 जागा मिळू शकतात. 1 जागा काँग्रेस आणि इतरांकडे जाण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलमध्ये भाजपला 48 टक्के, आपला 42 टक्के, काँग्रेसला 7 टक्के आणि इतरांना 3 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. बहुतांश पोलमध्ये भाजप सरकार स्थापन करताना दिसत आहे.
Post 14 of 15
Delhi – Exit Poll – Overall Seat Share (70 Seats) & Vote Share (%)#DelhiElection2025 #Election2025 #ExitPolls pic.twitter.com/oln254O9D7
— Axis My India (@AxisMyIndia) February 6, 2025