मुंबई – जेएनयूमध्ये (JNU) पुन्हा एकदा मोठा गोंधळ सुरू झाला आहे. शिवाजी जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( ABVP ) आणि डाव्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. डाव्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो खाली फेकल्याचा अभाविपचा आरोप आहे, तर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा दावा डावे करत आहेत. यावेळी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असून, विद्यापीठाकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
Delhi | ABVP members in JNU alleged portrait of Shivaji Maharaj was vandalised (19.02)
On the occasion of Shivaji Jayanti, we kept a portrait at student activity centre, but students from SFI threw it outside the room while garland was thrown in the dustbin: JNU ABVP Secretary pic.twitter.com/kuY7i0Izbw
— ANI (@ANI) February 19, 2023
राजधानी दिल्लीतील जेएनयूमध्ये शिवाजी महाराजांचे फोटो कथितपणे फेकल्याच्या निषेधार्थ अभाविपने निदर्शने केली. अभाविपचे सचिव उमेशचंद्र अजमेरा म्हणाल, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचा फोटो लावण्यात आला होता. जेएनयूमधील कम्युनिस्टांना हे सहन झाले नाही आणि त्यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा फेकून दिली आणि पुष्पहार डस्टबिनमध्ये टाकला.’
दरम्यन, प्रत्यक्षात रविवारी (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभाविपने सभेचे आयोजन केले होते. जेएनयू कॅम्पस तेफलाजमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा डाव्या पक्षांनी अपमान केल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावरून अभाविप आणि डाव्यांमध्ये संघर्ष झाला होता. यानंतर ABVP आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघ म्हणजेच JNUSU एकमेकांवर आरोप करत आहेत. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने सध्या कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
( जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन ) जेएनयूएसयूचे काय म्हणणे आहे?
तर दुसरीकडे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनने (JNUSU) अभाविपवर विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. जेएनयूएसयूच्या म्हणण्यानुसार, “एबीव्हीपीने पुन्हा एकदा टेफ्लास (वसतिगृह) मधील विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे”.
सोलंकी यांच्या वडिलांच्या हाकेवरून कँडल मार्चनंतर लगेचच हे दर्शन झाल्याचे या बाजूचे म्हणणे आहे. सध्या दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही पक्षांना शांत केले आहे.