दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांना कारावास

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांना सत्र न्यायालयाकडून शुक्रवारी सहा महिने कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2015 मध्ये मनीष घई या बांधकाम व्यावसायिकाच्या घरात बळजबरी घुसण्यासंबधी असलेल्या प्रकरणी त्यांना आरोपी निश्‍चित करण्यात आले आहे. तर, दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर त्यांना जामीनही मंजूर केला गेला आहे. आता सत्र न्यायालयाच्या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

याप्रकरणी गोयल यांच्यासह सुमीत गोयल, हितेश खन्ना, अरूल गुप्ता आणि बलबीर सिंह यांना देखील आरोपी ठरवण्यात आले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी 6 फेब्रुवारी 2015 रोजी स्थानिक बिल्डर मनीष घई यांच्या विवेक विहार येथील घरात गोयल यांनी आपल्या समर्थकांसह बळजबरीने प्रवेश केला होता. आपल्या घरात तोडफोड करण्यात आल्याचा आरोपही घई यांनी गोयल आणि त्यांच्या समर्थकांवर केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.