नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा या नेत्यांची नावे आहेत.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल, शिवराज सिंह चौहान यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. या यादीत मनोज तिवारी, दिनेश लाल यादव (निरहुआ), हेमा मालिनी, रवी किशन, हंसराज हंस, स्मृती इराणी यांसारखे अनेक चित्रपट कलाकारांचाही समावेश करण्यात आला आहे.
BJP releases list of star campaigners for the upcoming Delhi Assembly elections. #DelhiElectionsWithPTI pic.twitter.com/kJSyIkZ42V
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2025
राजधानी दिल्लीत निवडणुकीचा उत्साह दिसून येत आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान होईल, तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. भाजपची चौथी यादी कधी येईल याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. ही भाजपची शेवटची यादी असेल, ज्यामध्ये ११ उमेदवारांची नावे असतील. सध्या पक्षाने त्यांच्या स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.