Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी भाजपची चौथी तर काॅंग्रेसची पाचवी उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. भाजपच्या चौथ्या यादीत 9 उमेदवारांची नावे आहेत. पक्षाने ग्रेटर कैलास मतदारसंघातून मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या विरोधात शिखा राय यांना उमेदवारी दिली आहे. नितीशकुमार आणि चिराग पासवान यांच्या पक्षासाठी पक्षाने दोन जागा सोडल्या आहेत.
भाजपने बवानामधून रवींद्र कुमार, वजीरपूरमधून पूनम शर्मा आणि दिल्ली कँटमधून भुवन तन्वर यांना उमेदवारी दिली आहे. संगम विहारमधून चंदनकुमार चौधरी, ग्रेटर कैलाशमधून शिखा राय, त्रिलोकपुरीतून रविकांत उज्जैन, शाहदरा येथून संजय गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुस्लिमबहुल बाबरपूरमधून अनिल वशिष्ठ आणि गोकलपूरमधून प्रवीण निमेश यांना पक्षाने तिकीट दिले आहे. भाजपने आतापर्यंत 68 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. एनडीएच्या मित्रपक्ष जेडीयू आणि एलजेपीसाठी दोन जागा सोडल्या आहेत.
काँग्रेस उमेदवारांची पाचवी यादी जाहीर –
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी नामांकनाची अंतिम तारीख 17 जानेवारी आहे. दरम्यान, काँग्रेसने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून, त्यात दोन जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
दिल्ली विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की पांचवी लिस्ट। pic.twitter.com/UZLj5jeYQs
— Congress (@INCIndia) January 16, 2025
दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पाचव्या यादीत दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पक्षाने तिमारपूरमधून लोकेंद्र चौधरी यांना उमेदवारी दिली, तर सुरेश वाती चौधरी यांना रोहतास नगरमधून उमेदवारी दिली. अशा प्रकारे काँग्रेसने दिल्लीतील सर्व 70 जागांवर उमेदवार जाहीर केले.
काँग्रेसने कालही यादी जाहीर केली होती –
एक दिवस आधी काँग्रेसने बुधवारी रात्री उशिरा 5 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली होती. या यादीत बदरपूरचे माजी काँग्रेस खासदार अवतार सिंह भडाना यांचे पुत्र अर्जुन सिंह भडाना यांना तिकीट मिळाले आहे. तसंच तुघलकाबादमधून वीरेंद्र बिधुरी, बवानामधून सुरेंद्र कुमार, रोहिणीमधून सुमेश गुप्ता आणि करोलबागमधून राहुल घनक यांना उमेदवारी देण्यात आली होती.
दरम्यान, दिल्ली निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारीला मतदान होईल, तर मतमोजणी 8 फेब्रुवारीला होईल.