‘तेजस एक्‍स्प्रेस’ला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना मिळणार भरपाई

नवी दिल्ली : देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस एक्‍स्प्रेसला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना भरपाई दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एखाद्या ट्रेनला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना भरपाई देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. आयआरसीटीसीकडून प्रवाशांना ही भरपाई दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शनिवारी लखनऊ-नवी दिल्ली तेजस एक्‍स्प्रेसला दोन्ही बाजूंनी उशीर झाला. यावेळी लखनऊ येथून दिल्लीला जाणारे प्रवासी होते. तर दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या तेजस एक्‍स्प्रेसमधून 500 प्रवासी प्रवास करत होते. तेजसची नवी दिल्ली स्थानकावर पोहोचण्याची वेळ दुपारी 12 वाजून 25 मिनिट आहे. पण ही गाडी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली.

जवळपास तीन तासांचा उशीर ट्रेनला झाला. यानंतर रात्रीही ही ट्रेन लखनऊला रात्री 10 वाजून पाच मिनिटांऐवजी 11 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली. आता प्रवाशांना ट्रेनला उशीर झाल्यामुळे भरपाई म्हणून 250 रुपये मिळणार आहेत. आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भरपाईसाठी सर्व प्रवाशांच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवली आहे. या लिंकवर क्‍लिक करून प्रवासी भरपाईची मागणी करू शकतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.