- अपक्षांचे भाजपाच्या एक पाऊल पुढे;
देहूगाव – नवनिर्मित देहू नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेना, कॉंग्रेसचा सुपडा साफ केला. धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत भाजपाची धोबीपछाड करीत एक हाती सत्ता मिळवित विजयाचा झेंडा फडकविला. एकतर्फी विजयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण पाहवयास मिळत आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढविलेल्या देहू नगरपंचायतीच्या विजयामुळे राष्ट्रवादी पक्षाची विजयी घोडदौड कायम राहिली आहे.
देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22, दोन टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत (21 डिसेंबर व 18 जानेवारी) घेण्यात आलेल्या मतदानाचा निकाल बुधवारी (दि. 19) जाहीर करण्यात आले आहे. या निकालाने भाजपसह अन्य पक्षांना मोठा धक्का दिला आहे. पहिल्याच निवडणुकीत पक्षातील आजी-माजी पदाधिकारी तसेच माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. देहू नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे 14, तर भाजप 1, अपक्ष- 2, कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी एकही जागा मिळविता आली नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस – वार्ड क्र. 1 – मीना राहूल कुऱ्हाडे, वार्ड क्र. 2 – रसिका स्वप्नील काळोखे, वार्ड क्र. 3 – पूजा अमोल दिवटे, वार्ड क्र. 4 मयूर दत्तात्रय शिवशरण, वार्ड क्र. 6 – पूनम विशाल काळोखे, वार्ड क्र. 9 – स्मिता शैलेश चव्हाण, वार्ड क्र. 10 – सुधीर सुरेश काळोखे, वार्ड क्र. 11 पौर्णिमा विशाल परदेशी, वार्ड क्र. 12 – सपना जयेश मोरे, वार्ड क्र. 13- प्रियांका अभिजित मोरे, वार्ड क्र. 14 प्रवीण रामदास काळोखे, वार्ड क्र. 15 आदित्य चिंतामण टिळेकर, वार्ड क्र. 16 – योगेश बाळासाहेब परंडवाल, वार्ड क्र. 17 ज्योती रोहिदास टिळेकर असे 14 उमेदवार विजयी झाले आहेत.
अपक्ष उमेदवार वार्ड क्रमांक 5 मधून शितल अनिल हगवणे, वार्ड क्र. 7 – योगेश हनुमंत काळोखे आणि वार्ड क्र. 8 मध्ये भाजपाचे पूजा सुमित काळोखे हे उमेदवार विजयी झाले आहेत.