द्रमुक आणि कॉंग्रेसमधील तामीळनाडूतील जागावाटप निश्‍चित 

चेन्नई – द्रमुक आणि कॉंग्रेस या मित्रपक्षांनी बुधवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तामीळनाडूतील जागवाटपावर शिक्कामोर्तब केले. भाजप, अण्णाद्रमुक आणि पीएमके या पक्षांची आघाडी निश्‍चित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घडामोड घडली.

द्रमुकचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी येथे कॉंग्रेस प्रभारी मुकूल वासनिक आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष के.एस.अळगिरी यांच्या उपस्थितीत जागावाटपाबाबतची घोषणा केली. त्यानुसार कॉंग्रेस तामीळनाडूतील लोकसभेच्या एकूण 39 जागांपैकी 9 जागा लढवणार आहे. द्रमुक इतर मित्रपक्षांबरोबरचे जागावाटप लवकरच निश्‍चित करणार आहे. तामीळनाडूच्या शेजारील पुद्दुचेरीत लोकसभेची 1 जागा आहे. ती कॉंग्रेससाठी सोडण्यात आली आहे. पुद्दुचेरीत कॉंग्रेसचे सरकार आहे. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीची प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या अण्णाद्रमुक, भाजप, पीएमके आघाडीचे जागावाटप मंगळवारी जाहीर झाले. त्यानुसार भाजप लोकसभेच्या 5 तर पीएमके 7 जागा लढवणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.