#InternationalYogaDay : कोरोना व्हायरसची भीती घालवायची तर ‘हे’ नक्की करा

आपल्याला चमत्कारिक लाभ दिसून येतील

पुणे- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच नागरिक आपल्या घरात असून, वर्क फ्रॉम होम आणि घरातील इतर कामे करताना दिसत आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरस पासून आपला बाचाव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणे. तुम्हाला देखील रोगप्रतिकार शक्ती बळकट करायची असेल तर खालील माहिती नक्की वाचा…

रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी आपले मन शांत ठेवणे गरजेचे असते. ध्यान केल्याने स्मरणशक्ती तसेच एकाग्रता सुद्धा वाढते. त्यामुळे रोज ध्यान करा. ध्यान म्हणजे विचारांवर नियंत्रण ठेवणे.

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे. ध्यान केल्याने उच्च रक्तचापाला नियंत्रित करता येतं. शरीरात स्थिरता वाढते आणि ही स्थिरताच शरीरास मजबूत करते. डोकेदुखी कमी होते, मन शांत राहतं.

जर तुम्हला ध्यान करण्यासाठी बसायचे असेल तर, अंघोळ करून सुखासनात डोळे मिटून आसनावर बसा. फक्त 5 मिनिटे आपले डोळे बंद करून शरीराची काहीही हाल चाल न करता बसावे. अश्या वेळी आपल्या डोळ्यासमोर येणाऱ्या अंधाराकडे बघत राहावे. आणि श्वासाकडे लक्ष द्यावे.

आपल्या मनात असंख्य विचार येतील त्याकडे लक्ष्य न देता फक्त श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यावे ज्याने मानसिक हालचाली त्वरित थांबतात. त्यामुळे तुमच्या डोक्यातील सर्व नकारात्मक विचार निघून जातील. आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.