संरक्षणमंत्र्यांचा अरुणाचल प्रदेश दौरा; चीन सीमेजवळ सुरक्षेचा घेतील आढावा

नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गुरुवारी अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जातील. ते चीन सीमेवर सुरक्षेचा आढावा घेतील. यासह ते तवांग वॉर मेमोरियलवर पुष्पहार अर्पण करतील.  सिंह १५ नोव्हेंबरला बुमला भागात सैन्याच्या चौक्यांना भेट देतील. आणि या भागात बांधलेल्या पुलाचे उद्घाटन करतील. संरक्षणमंत्री म्हणून राजनाथ सिंह यांची अरुणाचल प्रदेशातील ही पहिलीच भेट असेल.

गेल्या महिन्यात राजनाथ सिंह सियाचीन दौर्‍यावर गेले होते. श्योक नदीवरील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी संरक्षणमंत्री लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासमवेत होते. ज्यामुळे चीनबरोबर वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) दौलत बेग ओल्डि सेक्टरला संपर्क सुकर होईल.

रणनीतिकदृष्ट्या राजनाथ सिंह यांचा तवांग दौरा महत्वाचा आहे. कारण ते चीनच्या सीमेला लागून आहे. तसेच जवळ असलेला भाग डोकलाम देखील नेहमीच चर्चेत असते. जिथे चिनी सैनिकांच्या घुसखोरीच्या बातम्या वारंवार येतात. चीन या संपूर्ण क्षेत्रावर दावा करीत आहे आणि तिबेटचा एक भाग असल्याचे वर्णन करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.