#व्हिडिओ : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे स्वदेशी ‘तेजस’मधून उड्डाण

भारतीय हिंदुस्थान ऍरोनोटिक्‍स लिमीटेडने तेजसची केली निर्मीती

बंगळूरु : देशातील बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी आकाशात उड्डाण केले. कर्नाटकच्या बेंगळुरूमधील हिंदुस्थान एरोनोटिक्‍स लिमीटेडच्या विमानतळावरुन राजनाथ सिंह यांनी स्वदेशी लढाऊ विमान ‘तेजस’ मधून उड्डाण केले. देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी स्वदेशी लढाऊ विमान ‘तेजस’ मध्ये पहिल्यांदाच उड्डाण केले आहे.

राजनाथ सिंह तेजस विमानात सुमारे अर्धा तास राहिले. तीन वर्षांपूर्वी तेजसची हवाई दलात एन्टी झाली आहे. दरम्यान, भारतीय हिंदुस्थान एरोनोटिक्‍स लिमीटेडने तेजसची निर्मीती केली आहे.

राजनाथ सिंह यांनी आज सकाळी दहा वाजता तेजसमधून आकाशात भरारी घेतली. अर्धा तास तेजसमध्ये वेळ घातल्यानंतर सकाळी 10.30 वाजता ते परत खाली आले. विमान उतरल्यानंतर राजनाथ सिंह यांनी एचएएलच्या कर्मचाऱ्यांनाही भेट दिली तसेच त्यांच्या निर्मीतीविषयी त्यांचे अभिनंदन केले.

तेजस हे एक हलके लढाऊ विमान आहे, जे हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेडने (एचएएल) तयार केले आहे. एचएएलला 83 तेजस विमानांव्दारे सुमारे 45 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. संरक्षणमंत्र्यांच्या तेजस विमानाचे उड्डाण हे त्यावेळी झाले आहे जेव्हा एचएएलकडून देशात 83 एलसीए मार्क 1ए विमानांच्या निर्मितीसाठी 45 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)