श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये लष्कराचा एक मेजर शहिद झाला आहे. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.
मात्र, अन्य एक लष्करी अधिकारी आणि 2 जवानही या चकमकीमध्ये जखमी झाले आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातल्या आछाबल भागात ही चकमक झाली होती.
दरम्यान, आज रक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि सेना प्रमुख बिपीन रावत यांनी या चकमकीमध्ये शहीद झालेल्या ‘मेजर केतन शर्मा’ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Paid tributes to Major Ketan Sharma who made the supreme sacrifice while fighting against the terrorists in Jammu and Kashmir.
Major Sharma fought valiantly like a true soldier. My heart goes out to his bereaved family. pic.twitter.com/gJCcqEtFwD
— Rajnath Singh (मोदी का परिवार) (@rajnathsingh) June 18, 2019