नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इराणचे संरक्षण आणि सशस्त्र दल पुरवठामंत्री ब्रिगेडियर जनरल आमीर हातामी यांच्यात काल द्विपक्षीय बैठक झाली.
मॉस्कोवरून नवी दिल्लीला येताना संरक्षण मंत्र्यांनी तेहरानमधे विराम घेतला होता, त्यादरम्यान ही बैठक झाली. हातामी यांच्या विनंतीवरून त्यांच्या निवासस्थानीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
दोन्ही मंत्र्यांमधे मैत्रीपूर्ण आणि सौहार्द वातावरणात ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि इराणच्या पुरातन सांस्कृतिक, भाषाविषयक आणि सभ्यताविषयक संबंधांच्या महत्वावर जोर दिला.
त्यांनी द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्यावर आणि अफगाणिस्तानातील शांतता आणि स्थैर्य याबाबत क्षेत्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर चर्चा केली.