पुणे : बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निर्देशानुसार विक्रोळी, मुंबई येथील पोलीस ठाण्यात ऍड. अनिकेत यादव यांना पोलिसांनी डांबुन ठेवून मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिवाजीनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील वकिलांनी गुरूवारी (दि. 6) कोटला लालफित लावून दिवसभर काम केले.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. श्रीकांत आगस्ते, नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. सतिश मुळीक, नवनिर्वाचित उपाध्यक्ष ऍड. योगेश तुपे, ऍड. सचिन हिंगणेकर, सचिव ऍड. घनश्याम दराडे, ऍड. विकास बाबर, खजिनदार ऍड. भाग्यश्री गुजर-मुळे, कार्यकारिणी सदस्य ऍड. विराज करचे पाटील यांच्यासह अन्य वकील यामध्ये सहभागी झाले होते. ऍड. यादव यांना मारहाण केल्याच्या घटनेची बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने दखल घेतली असून, कौन्सीलच्या सचिवांनी कोटला लालफित बांधून घटनेचा निषेध करण्याचे आवाहन राज्यातील वकिलांना केले होते. त्यानुसार पुण्यातील वकिलांनी या घटनेचा निषेध केला.