बंगळुरू : तेजस हे भारतीय बनावटीचे विमान चालवणारे राजनाथसिंग हे पहिले संरक्षण मंत्री बनले. त्यांनी गुरूवारी सकाळी सुमारे ३० मिनिटे हा थरार ट्रेनर सहवैमानिकासह अनुभवला.
हिंदुस्तान ऍेोनॅटीकच्या विमानतळावरून राजनाथसिंह (वय ६८) यांचे विमान झेपावले. १३ हजार फुट उंचीवर ते गेले. हे उड्डाण येवढे आरामदायी होते की येवढ्या उंचीवर पोहोचल्याचे जाणवले नाही, असे वैमानिक एअर व्हाइस मार्शल एन. तिवारी यांनी सांगितले.
या घटनेने या विमानाच्या निर्मितीला चालना मिळाणार असल्याचे मानले जात आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना राजनाथसिंह म्हणाले, हा रोमांच माझ्या जीवनातील विशेष अनुभव आहे. हे खुप आरामदायी विमान आहे. माझ्या पायलटने सांगितले ते मी केले. आपले वैमानिक कोणत्या अवस्थेत विमान उड्डाण करतात हे मला जाणून घ्यायचे होते. मी त्यांच्या धैर्याला सलामकरतो. डीआरडीओचे शास्त्रज्ञ, हिंदुस्तान ओरोनॅटिकचा मला अभिमान वाटतो. या विशेष कौशल्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.