चेल्सीचा पराभव, अर्सेनलला विजेतेपद

Madhuvan

लंडन – एमेरिक ऑबामेयांग याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर अर्सेनलने चेल्सीचा 2-1 असा पराभव करत एफए करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या इतिहासातील त्यांचे हे 14 वे विजेतेपद ठरले.

सामन्याला सुरुवात झाल्यावर चेल्सीच्या ख्रिस्तियन पुलीसीस याने 5 व्या मिनिटालाच अर्सेनलचा बचाव भेदण्यात यश मिळवले व गोल केला. पहिल्याच हाफमध्ये 0-1 असे पिछाडीवर पडलेल्या अर्सेनलने आपली जिद्द सोडली नाही. एमेरिक ऑबामेयांग याने 23 व्या मिनिटाला गोल केला व संघाला बरोबरी साधून दिली.

यानंतरही दोन्ही संघांनी एकमेकांवर आघाडी घेण्यासाठी आक्रमक खेळ केला. मात्र, दोन्ही संघांचा बचाव अप्रतिम होता. पहिला हाफ बरोबरीत सुटला. मात्र, दुसरा हाफ सुरू झाल्यावर आर्सेनलने चेल्सीच्या खेळाडूंवर दडपण ठेवण्यात यश मिळवले. 67 व्या मिनिटाला एमेरिक ऑबामेयांगने आणखी एक गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर चेल्सीला आर्सेनलचा बचाव भेदता आला नाही व पराभव स्वीकारावा लागला.

करोनाचा धोका मार्चपासून सुरू झाल्याने स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. हा धोका कमी झाल्यावर काही निर्बंधांचे पालन करत स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली. यावेळी मात्र जगप्रसिद्ध विम्बली मैदानावर ठरावीक संख्येने प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. या विजेतेपदासह आर्सेनलने युएफा युरोप लीग स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचीही कामगिरी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.