पुणे – पीएमडीटीए-केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात नील केळकर, अंकित राय, विश्वजीत सणस, मनन अगरवाल यांनी तर, मुलींच्या गटात दुर्गा बिराजदार यांनी मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आगेकूच केली.
या स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अंकित राय याने तिसऱ्या मानांकित शौर्य घोडकेचा 6-4 असा तर, नील केळकर याने सहाव्या मानांकित अर्चित धूतचा टायब्रेकमध्ये 6-5 (2) असा संघर्षपूर्ण पराभव केला. याच गटात विश्वजीत सणस याने पाचव्या मानांकित देव तुराखियावर 6-3 असा विजय विजय मिळवला.
मनन अगरवाल याने सातव्या मानांकित चिनार देशपांडेचे आव्हान टायब्रेकमध्ये 6-5(8) असे संपुष्टात आणले. मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत मृणाल शेळके हिने अव्वल मानांकित अहाना कौरचा 6-1 असा सहज पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. दुर्गा बिराजदार हिने दुसऱ्या मानांकित मृण्मयी जोशीवर 6-5(4) असा सनसनाटी विजय मिळवला.