पराभव मुलायमसिंग यांच्या पुतणीचा, झटका भाजपला !

आग्रा – उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. मुलायमसिंग यांचे
भाऊ आणि बदायूँ लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार धर्मेंद्र यादव यांच्या मुलीला
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र मुलायमसिंग यांची
पुतणी असणाऱ्या संध्या यादव या भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत
होत्या. त्यामुळे या पराभवाचा झटका भाजपला बसला आहे.

समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रमोद कुमार यांनी संध्या यादव यांचा पराभव केला. यादव यांनी
याआधी समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्या
मैनपुरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही होत्या. यावेळी मात्र त्यांना एक हजार मतांनी पराभव
स्वीकारावा लागला.

संध्या यादव यांचे पती अनुजेश यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 2019 मध्ये
संध्या यांनीही भाजपची वाट धरली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.