मुंबई – उद्योन्मुख टेनिसपटू दीपीत पाटील याने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करताना राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत आपल्या विजयी मालिकेत सातत्य राखले. दीपीतने आपल्या कुमार गटातील विजेतेपदाला आज युवा गटाच्या विजेतेपदाची जोड देत दुहेरी मुकुट संपादन केला.
दीपीतने युवा विभागात विजेतेपद मुंबई शहरच्या तन्मय राणेचा 11-5, 12-10, 11-13, 14-12, 12-14, 11-6 असा पराभव केला. दीपीतने यापूर्वी कुमार गटातही विजेतेपदाचा मान मिळविला होता. कुमार गटात त्याने विजेतेपदाच्या लढतीत मुंबई उपनगरच्या आदीस आनंद याचे आव्हान 11-13, 11-4, 11-7, 12-10, 9-11, 11-3 असे संपुष्टात आणले.
युवा गटातील उपांत्य फेरीच्या सामन्यात दीपीतने संघर्षपूर्ण लढतीनंतर मंबईच्या ए. रिगनचे आव्हान 11-9 9-11, 12-10, 6-11, 11-8, 12-14, 12-10 असे संपुष्टात आणले. तन्मयने मुंबई उपनगरच्या चिन्मय सोमय्याचा 9-11, 11-8, 11-7, 5-11, 4-11, 11-8, 11-9 असा पराभव केला.