दीपिकाचा वीकएन्ड ट्रॅव्हल प्लॅन घरातल्या घरातच

दीपिकाने या वीकएन्डला आपल्या प्रवासाचा एक भन्नाट प्लॅन बनवला होता. लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडता येत नसल्याने दीपिका आणि रणवीरने मिळून घराचा नकाशा बनवला आणि घराच्या प्रत्येक खोलीला एका हिलस्टेशनचे नाव देऊन टाकले. त्यानुसार आपण कोठे कोठे जाणार आहोत, याची यादीही त्या दोघांनी मिळून तयार केली आहे.

आपल्या घरातल्या राहण्यामध्ये थोडा विरंगुळा यावा यासाठी ही नवी शक्कल दीपिकाने लढवली आहे. यामुळे लांब दूरवर कुठेतरी फिरायला गेल्याचे मानसिक समाधान तरी मिळाल्याचा दीपिकाचा दावा असावा. वेळ घालवण्यासाठी दीपिकाने आपले स्वयंपाकघर देखील आवरायला काढले आहे.

एरवी फारशी स्वयंपाकघरात न येणाऱ्या दीपिकाने प्रत्येक पदार्थाच्या चिठ्ठ्या बनवल्या आणि त्या त्या पदार्थांच्या डब्यांवर चिकटवून टाकल्या. यामुळे कोणत्या डब्यात कोणता पदार्थ आहे, हे डबा न उघडता समजू शकेल. दीपिकाला हे पूर्वीही करता येऊ शकले असते. मात्र, तेवढा वेळ त्यासाठी देणे तिला शक्‍य झाले नसावे. आता लॉकडाऊनमुळे भरपूर वेळ मिळाल्याने त्याचा सदुपयोग दीपिकाने केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.