दीपिका पादुकोण पुन्हा एकदा करण जोहरच्या प्रॉजेक्टमध्ये काम करणार असल्याचे समजते. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळु शकला नाही. या चित्रपटात दीपिकासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
करण जोहरच्या आगामी चित्रपटासाठी मुख्य नायकाचा शोध सुरू आहे.
यासाठी विकी कौशल आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची नावे आघाडीवर आहेत. या दोघांपैकी कोणाची निवड होईल हे लवकरच समजेल. दरम्यान, “पद्मावत’ चित्रपटासाठी संजय लीला भंसाली यांनी राजा रतन सिंहच्या भूमिकेसाठी विकी कौशलला पसंती दर्शविली होती. मात्र, दीपिकाने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला होता.
त्यावेळी विकीहा प्रसिद्धिच्या झोतात नव्हता. त्यामुळे दीपिकाने त्याच्यासोबत काम करू इच्छित नव्हती. परंतु आता त्याने स्वःतला सिद्ध केल्याने दीपिका त्याच्यासोबत काम करण्यास तयार असल्याचे समजते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दीपिकाला करण जोहरच्या ऑफिसवर स्पॉट करण्यात आले होते. यावेळी तिने आगीा चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली असून ती तिला खुप आवडली आहे. या प्रॉजेक्टसाठी दीपिकाने होकार दर्शविल्याचा दावा केला जात आहे. या चित्रपटात दीपिका मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे. मात्र, अद्याप नायक निश्चित झालेला नाही.