“छपाक’च्या मेकअपसाठी दीपिकाला लागतो भरपूर वेळ

दीपिका पदुकोणने “छपाक’ या आपल्या पुढच्या सिनेमाचे शुटिंग सुरू केले आहे. मेघना गुलजारच्या दिग्दर्शनाखालील हा सिनेमा पूर्ण व्हायला खूप वेळ लागण्याची शक्‍यता आहे. या सिनेमात दीपिका ऍसिड हल्ल्यातील पीडीत मुलीचा रोल करते आहे. तिचा लुक खूपच हटके असल्याने त्यासाठी मेकअप आर्टिस्टना खूपच कष्ट घ्यायला लागतात. दीपिकाच्या मेकअपसाठी दरवेळी किमान 3 ते 4 तासांचा अवधी लागतो. एवढेच नव्हे तर शुटिंग झाल्यावर मेकअप उतरवायला आणि सर्वसामान्यांप्रमाणे दिसायलाही तिला तेवढाच वेळ लागतो. काही दिवसांपूर्वी तिचा पहिला लुक रिलीज केला गेला तेंव्हा ही दीपिकाच आहे, यावर कोणाचाच विश्‍वास बसला नव्हता.

मेकअप केलेली दीपिका आणि हा सिनेमा जिच्या जीवनवर आधारीत आहे त्या लक्ष्मीमध्ये एवढे प्रचंड साम्य आढळून आले की दीपिकाला वेगळे ओळखणेही अवघड होऊन बसले होते. दीपिका “छपाक’मध्ये लीड रोलच्या बरोबर या सिनेमाची निर्मितीही करते आहे. निर्माती म्हणून दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा असेल. तिच्या सिनेमांना 100 कोटींच्या क्‍लबमध्ये स्थान मिळणे आता काही आश्‍चर्य नसलेली बाब झाली आहे. आता तिचा सिनेमांना 200 कोटींच्या क्‍लबमधील स्थान खुणावते आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.