यंदा दिवाळी साजरी करण्याबाबत दीपिका म्हणते….

मुंबई- सध्या सगळ्या जगावर कोरोनामुळे संकट आले आहे. अनेकांना या संकटाचा सामना करावा लागतो आहे. त्यात यंदा अनेकांची दिवाळी अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाऊन आणि आर्थिक व्यवस्था ढासळल्याने अनेकांच्या आयुष्याला चिंतेची किनार आहे.

याच कारणामुळे यावर्षी दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादूकोनने घेतला आहे. यंदा ब़ॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी जग सोडलं त्यामुळे बॉलीवूडमध्येही शांततेचं वातावरण आहे.

“यंदाची दिवाळी आम्ही साधेपणानेच साजरी करणार आहोत. कारण अद्याप आपण कोरोनाला पळवून लावलेलं नाही. म्हणून आपण सगळ्यांनीच काळजी घेणं आवश्यक आहे. आमच्याकडेही आम्ही दिवाळी घरीच साजरी करणार आहोत. आम्ही आमचं कुटुंबं अगदी साधेपणाने दिवाळी साजरी करणार आहे. यंदाचं वर्ष अनेक गोष्टींच्या अनुषंगाने वेदनादायी आहे. त्यामुळे आम्ही घरी पूजाही करू. पण जो वेळ असेल तो घरच्यांसोबतच घालवणार आहोत” , असं दीपिकाने सांगितले आहे.

दरम्यान, बॉलीवूडकरांची यंदाची साधेपणाची दिवाळी नक्की कशी असेल, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.