दीपिका पदुकोणने अलीकडेच एका इंटरव्ह्यूमध्ये आपल्या आगामी 10 वर्षांच्या प्लॅनविषयी सांगितले आहे. घर, परिवार आणि मुलांबाबतच्या प्लॅनिंग संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना ती उत्तर देणे सतत टाळतच राहिली असते.
मात्र या 10 वर्षांच्या प्लॅनिंगमध्ये तिने मुलांबाबत अगदी खुलेपणाने उत्तरे दिली आहेत. खरे तर लग्नापूर्वीच तिने हे प्लॅनिंग केले होते. आपल्याला एकूण 3 मुले होतील, असा दीपिकाचा अंदाज आहे.
आपल्या तिन्ही मुलांचे संगोपन आपण अगदी उत्साहाने करणार आहोत. तिन्ही मुलांना आपल्याबरोबर शुटिंगच्या सेटवर नेणार असल्याचेही दीपिकाने म्हटले होते.
आई-वडील दोघेही काम करून मुलांचे संगोपन करत असत. त्यामुळे दीपिकाला नेहमीच स्वतःची सर्व कामे करण्याची सवय होती. तिने तर तिच्या बहिणीचीही काळजी घेतली होती.
त्यामुळे आपणही तसेच काम करता करता मुलांचे संगोपन करणार असल्याचे दीपिका म्हणाली होती. रणवीरबरोबर विवाहबद्ध होताना त्यानेही आपल्या मुलांसाठी वेळ काढावा, अशीच तिची अपेक्षा आहे.
दीपिका आणि रणवीर “83”मध्ये एकत्र दिसणार आहेत. याशिवाय शाहरुख खान आणि जॉन अब्राहमबरोबरच्या “पठाण’मध्येही ती दिसणार आहे.