मुंबई – मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिकासह , सारा अली खान , श्रद्धा कपूर , रकूल प्रीत सिंग नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिकासह सारा अली खान , श्रद्धा कपूर आज चौकशी केली जात आहे.
यातच गेल्या दोन तासांपासून तिची चौकशी सुरु आहे. दीपिकानं ड्रग्ज चॅटसंदर्भात कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र आपण ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं तिनं सांगितलं असल्याचीही माहिती आहे. दीपिकाकडून काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याची देखील माहिती मिळलेली आहे. गेल्या तीन तासांहून अधिक काळापासून दीपिकाची चौकशी सुरु आहे.